“ई वर्ले अक्षर” हा कार्यक्रम नुकताच रविवार दिनांक १४ नोव्हेंबर, २०१० ला मराठी ग्रंथसंग्रहालय, ठाणे येथे पार पडला. इंटरनेट, ब्लॉग आणि वेबसाईटवर व्हर्च्युअल जगातील मराठी कवींना प्रत्यक्ष भेटीची संधी मिळावी, ऑर्कुट, फ़ेसबुक, च्या बाहेर पडून थोडं प्रत्यक्ष एकमेकांची ओळखपाळख आणि चर्चा व्हावी अशा हेतूने या मेळाव्याचे आयोजन केले होते.
८४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची पूर्वतयारी म्हणून आज “ई वर्ले अक्षर” काव्यसोहळा मराठी ग्रंथसंग्रहालयात साजरा करण्यात आला. “ई वर्ले अक्षर” काव्यसोहळ्याचे उद्घाटन संमेलनाचे निमंत्रक प्रा. नरेंद्र पाठक यांच्या हस्ते झाले. “मराठी सृष्टीडॉटकॉमचे” निनाद प्रधान, कवी अशोक बागवे यांची उपस्तिथी कार्यक्रमाच्या शोभेत भर घालणारी होती. या वेळी संमेलनाचे कार्याध्यक्ष पां. के. दातार, प्रा. विद्याधर वालावलकर उपस्थित होते.
३ तास चाललेल्या या कार्यक्रमात इंटरनेट, ब्लॉग आणि वेबसाईटवर व्हर्च्युअल जगातील मराठी कवींच्या कवितांचे वाचन एकदम जल्लोषात साले. तसेच ज्येष्ठ साहित्यिक व ८४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष श्री उत्तम कांबळे यांची “प्रिय पोरा’ ही कविता कवी आल्हाद महाबळ यांनी सादर केली. कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, नारायण सुर्वे यांच्या कवितांनी कार्यक्रमात गोडवा आणला. कवितांचे सादरीकरण समीर सामंत, प्राजक्त देशमुख, सुमन परब, आनंद माने,आल्हाद महाबळ, कौस्तुभ आपटे, भारती सरमळकर यांनी केले. तर, कार्यक्रमाच्या आयोजनाची व सादरीकरणाची जबाबदारी मकरंद सावंत व सुमन परब यांच्या चमूने सांभाळली होती. साहित्य प्रतिष्टानच्या चमूने “ई वर्ले अक्षर” कार्यक्रमाचे केलेले आयोजन खरोखरच प्रशंसनीय आहे. श्री सुनील सामंत आणि साहित्य प्रतिष्टानच्या चमूचे साहित्य चिंतन तर्फे हार्दिक अभिनंदन!
८४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात “काव्यजल्लोष जागर” हा २४ तास नव्या दमाच्या कवींचं कविता वाचनाचा कार्यक्रम होणार आहे. त्याची पायाभरणी म्हणजेच “ई वर्ले अक्षर”. “काव्यजल्लोष जागर” मध्ये अख्ख्या महाराष्ट्रातून तरुणांनी कविता , गाणि इत्यादी जे काही सादर करायचं असेल त्यासाठी नांव नोंदणी करावी आसे आहावन आयोजकांनी केल आहे. “काव्यजल्लोष जागर” बद्दल अधिक माहिती साठी सुमन परब (९८२०११२५२६) किवा मकरंद सावंत (८०८२०४४००४) यांना इच्छुकांनी संपर्क साधावा हि विनंती.
KeyWords
८४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, मराठी साहित्य संमेलन, साहित्य प्रतिष्टान, प्रकाशित, ई-पुस्तके, ई-नियतकालिके, साहित्य, साहित्य चिंतन, मराठी, मराठी पुस्तके,मराठी कविता, कविता, मराठी सृष्टी, काव्यजल्लोष जागर, marathi kavita, marathi books, marathi books read online, free ebooks, fiction books, adventure books, ebook, ebooks and free, online books, read books online, ebook library

November 16, 2010 at 8:12 am
Aabhinandan…..