महामानव शिवाजी महाराज

महामानव शिवाजी महाराज: विकृत जेम्स लेनच्या पुस्तकाचा सडेतोड प्रतिवाद!

Mahamanav Shivaji Maharaj

महामानव शिवाजी महाराज : विकृत जेम्स लेनच्या पुस्तकाचा सडेतोड प्रतिवाद!

शिवाजी-हिंदू किंग ऑफ इस्लामिक इंडिया या नावाचे वादग्रस्त पुस्तक अमेरिकी लेखक जेम्स लेन यांनी लिहिले, त्यावेळी त्याचे पडसाद भारतात उमटणे साहजिकच होते. खरे तर या पुस्तकाचे नावच आक्षेपार्ह आहे. मुस्लिम भारतातील हिंदू राजा ही छत्रपती शिवाजी महाराजांची कधीच ओळख नव्हती! या पुस्तकावर महाराष्ट्र सरकारने 2005 साली बंदी घातली होती, ती 2010 साली सर्वोच्च न्यायालयाने उठविली. त्यामागील कारणे काहीही असली तरी हे पुस्तक भारतात खुलेपणाने विकले जाऊ लागले. या पुस्तकाची दुसरी आवृत्तीही जगभरात विकली गेली.

या पुस्तकातील अनेक मुद्दे हे वादग्रस्त, दिशाभूल करणारे आणि विसंगतीपूर्ण आहेत, त्यामुळे त्याबद्दल तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होणे साहजिकच होते. केवळ तोडमोड करून अथवा निषेध करून चालणार नाही. तर या पुस्तकातील मुद्यांचा प्रतिवाद केला गेला पाहिजे, या उद्देशाने इतिहासाचे अभ्यासक डॉ. प्रमोद पाठक यांनी महामानव-छ. शिवाजी महाराज या नावाचे पुस्तक लिहिले आणि नागपूरच्या नचिकेत प्रकाशनाने प्रकाशित केले आहे.

डॉ. पाठक यांची गोवादूत मध्ये याच विषयावरील लेखमाला वाचनीय ठरली होती आणि त्याला वाचकांचा चांगला प्रतिसादही लाभला होता. त्याच लेखांचे हे संकलन पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाले आहे. एकूण 29 लेख या पुस्तकात आहेत. जेम्स लेनने आपल्या पुस्तकात केलेले इतिहासाचे विकृतीकरण, जेम्सचे अज्ञान, धार्मिक लुडबुड, भारतीय संशोधनावर चिखलफेक, विसंगत विधाने, निरर्थक प्रश्न याबाबत वेगवेगळ्या लेखांमधून डॉ. पाठक यांनी आपल्या अभ्यासपूर्ण विवेचनाद्वारे केलेला प्रतिवाद वाचकांना अंतर्मुख व्हायला भाग पाडतो. कारण त्यांनी हे मुद्दे खोडताना जे ऐतिहासिक दाखले दिले आहेत. ते चपखल तर आहेतच, शिवाय भारतीय इतिहासतज्ज्ञ आणि परदेशी संशोधक यांच्या लेखी संदर्भासह दिले आहेत.

ज्येष्ठ इतिहास संशोधक विजय देशमुख, इतिहासाचार्य राजवाडे, ग.भा. मेहंदळे, वा.गो. गोखले, महादेवशास्त्री जोशी ते श्रीराम कामत यांच्या लेखनाचा संदर्भ देत, जेम्स फाकडा बाबासाहेब पुरंदरे आणि सरदेसाई यांच्यावरही कसा घसरला हे सप्रमाण दाखवून देताना डॉ. पाठक यांनी या पुस्तकलेखनासाठी घेतलेली मेहनत आणि त्यासाठी केलेल्या अफाट वाचनाची कल्पना येते. जेम्स लेनच्या अत्यंत पक्षपाती आणि कलुषित वृत्तीने लिहिलेल्या या पुस्तकाला ऐतिहासिक आधार तर अजिबातच नाही, उलट छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा कलंकित करण्याचा उद्देश मात्र स्पष्ट होतो, हे डॉ. पाठक यांच्या पुस्तकामुळे मराठी वाचकांसमोर अतिशय ठळकपणे आणि सबळ पुराव्यांसह आले आहे.

लेन यांचा महाराजांवर चिखलफेक करण्याचा हेतू उघड झाला आहे. या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद मूळ लेखकापर्यंत गेल्यास त्याच्या डोळ्यात झणझणीत अंजन पडल्याशिवाय राहणार नाही. तशी क्षमता डॉ. पाठक यांच्या लेखनात निश्चितपणे आहे. इतिहासातील काही घटना नव्याने जाणून घेण्यासाठीही हे पुस्तक अभ्यासकांनी अवश्य वाचावे. अशा या पुस्तकासाठी लेखक व प्रकाशन दोघांचेही अभिनंदन करणे आवश्यक आहे.

पुस्तक : महामानव छ. शिवाजी महाराज
लेखक : श्री. प्रमोद पाठक, पृष्ठ : 80, किंमत : 80 रु.
प्रकाशक : नचिकेत प्रकाशन
संपर्क : नचिकेत प्रकाशन,24, योगक्षेम ले-आऊ ट, स्नेह नगर, वर्धा रोड, नागपूर -440 015.
फोन : 0712-2285473
मोबाईल : 8149930004, 9225210130

Tags: , , ,
Subscribe to Comments RSS Feed in this post

7 Responses

  1. This is an outstanding work and it must be translated in English. I am willing to help in whatever way I can. I live in Austin, USA.

  2. Mala pustk khup avdtat

  3. how to download book in android mobile.

  4. Very nice book must read to all…
    To know about our great shivaji maharaj raje….

  5. thanks for thinking marathi & marathi reader.

  6. good.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*
*