read marathi books online, Free Marathi Novels, मराठी पुस्तके » पुस्तक परिचय

राज्यसेवा पूर्व परीक्षा – सामान्य अध्ययन पेपर १
Rajyaseva Purva Pariksha samanya adhayan Paper 1

एम.पी.एस.सी राज्यसेवा पूर्व परीक्षा ही बहूत्तरिय स्वरुपाची असते, म्हणजे एका प्रश्नाचे ४ उत्तर दिलेले असतात त्यापैकी सर्वात बरोबर उत्तर कोणत आहे ते अचूक निवडायचे असते. राज्यसेवा पूर्वपरीक्षा म्हणजे यशाची पहिली पायरी आहे आणि ती जर चढून पुढे जाता आल तर मात्र यश पण जर ह्या पायरी वरून चढता आल नाही तर मग अपयश पदरी पडते. चालू घडामोडी हा टॉपिक इतका विस्तीर्ण आहे कि काय वाचावे आणि काय नाही हे पहिल्यांदा कळतच नाही आणि आता तर फक्त मोजकेच दिवस बाकी आहेत पूर्व परीक्षेला.

म्हणून साहित्य चिंतनने नाथे पब्लिकेशन, नागपूर यांच्या सहयोगाने “राज्यसेवा पूर्व परीक्षा – सामान्य अध्ययन” पेपर १ आणलाय. ३८० रुपये मुल्य असलेले हे पुस्तक नाथे पब्लिकेशनने ई-बुक स्वरुपात साहित्य चिंतनच्या वाचकांसाठी उपलब्ध केलय अवघ्या २०० रुपयात.

नाथे स्पर्धा परीक्षा विभागाच्या तज्ज्ञ प्रशिक्षकांनी तयार केलेले. प्रत्येक घटकाचे अद्यावत प्रश्न समाविष्ट असलेले, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा पूर्वपरीक्षा २०१३ सुधारित अभ्यासक्रमावर आधारित (MPSC State Service Prelim Revised Syllabus), चालू घडामोडी (MPSC Current Affairs) – काय वाचायला पाहिजे,जुन्या प्रश्नपत्रिका, स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रम, स्पर्धा परीक्षा प्रश्नमंजुषा सूची, राज्यसेवा पूर्वपरीक्षा २०१३ – सामान्य अध्ययन अभ्यासक्रम पूर्णपणे समाविष्ट असलेले पुस्तक म्हणजेच “राज्यसेवा पूर्व परीक्षा – सामान्य अध्ययन” पेपर १

नाथे पब्लिकेशनचे संपादन मंडळ “राज्यसेवा पूर्व परीक्षा – सामान्य अध्ययन” पेपर १ प्रस्तावनेत लिहितात कि…

बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि असे बदलचक्र सातत्याने घडत असते, या सुभाषिताचा अनुभव स्पर्धा परीक्षेच्या विद्याथ्र्यांना येत असल्याचे दिसते आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २०१३ पासून राज्यसेवा (पूर्व) परीक्षेचा अभ्यासक्रम यूपीएससीच्या पूर्व परीक्षेप्रमाणे व्यापक केला आहे. बदललेला अभ्यासक्रम व पूर्व तसेच मुख्य परीक्षांचे स्वरूप, आय.बी.पी.एस.च्या बँकिंग परीक्षांमध्ये दिसत असलेली पारदर्शकता, एमबीए प्रवेश परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणे, इत्यादी बNयाच नव-नव्या कल्पना समोर येत आहेत. या बदलांव्यतिरिक्त अधिकारी होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना माहितीचा अधिकार, माहितीतंत्रज्ञानविषयक सायबर अ‍ॅक्ट, घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा, मानवी हक्क, पर्यावरण, ग्लोबल वार्मिंग यासारखे मुद्दे अभ्यासावे लागतील. सार्वजनिक धोरण, शाश्वत विकास, सर्वसमावेशकता यासारखे प्रशासक विषयक बाबींचा सविस्तर अभ्यास करणे क्रमप्राप्त आहे.

एमपीएससी विक्रीकर निरीक्षक (मुख्य) परीक्षा २०१२ च्या प्रश्नांचे स्वरूप लक्षात घेता अभ्यासक्रम विस्तारासोबत विश्लेषणात्मक व सखोल अभ्यासावर आधारित प्रश्न राज्यसेवा (पूर्व) परीक्षेतही विचारले जाण्याची सार्थ भीती उमेदवारांना वाटणे साहजिक आहे. खरे तर हे बदल सध्याच्या बदलत्या काळाप्रमाणे योग्यच आहेत, असेच म्हणावे लागेल. जगाचा भूगोल, सामान्य विज्ञान इ. विषयांवर यापूर्वीही प्रश्न विचारले जात होतेच. शिवाय पीएसआय / एसटीआय/ असिस्टंट (पूर्व) परीक्षेत या विषयांचा समावेश आहे. त्यामुळे प्राचीन व मध्ययुगीन इतिहास, पर्यावरण, सामाजिक विकास एवढेच नवीन विषय राज्यसेवा (पूर्व) परीक्षेच्या अभ्यासव्रâमात आहेत. त्यातही आधुनिक भारताचा इतिहास या विषयावरच सर्वाधिक प्रश्न विचारण्याची शक्यता असून पर्यावरण या विषयाचा काही अंश प्राकृतिक भूगोलमध्ये असलेला असल्यामुळे बदललेला अभ्यासक्रम एकदमच नवीन, अवघड आणि विस्तृत आहे, असे म्हणणे फारसे योग्य ठरणार नाही.

आयोगाने प्रश्न विचारण्याचा पद्धतीमध्ये व्यापक बदलाचे संकेत यापूर्वीच दिले आहेत. याचा परिणाम येथेही अभ्यासावर पर्यायाने गुणानुक्रमावर होईलच. अर्थातच संबंधित ग्रंथाची रचना साकारतांना या सर्व बाबींचा विचार करूनच प्रत्येक विषयाची मांडणी करण्यात आली आहे. परिक्षाभिमुखता जोपासण्याच्या दृष्टीने सुरूवातीला विषयाची वर्णनात्मक मांडणी आणि त्यानंतर लगेच त्यावर आधारित वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नोत्तरे देण्यात आलीत. पारंपारिक वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांसोबतच अलिकडे आयोगाने विचारलेल्या प्रश्नांच्या कलानुसार प्रत्येक प्रकरणात प्रश्नोत्तरे तयार करण्यात आली. यासाठी विषयतज्ज्ञांची मदत घेण्यात आली. परिक्षाभिमुखतेबरोबरच अचुकतेवरही येथे विशेष लक्ष देण्यात आले.

परीक्षेच्या सरावाच्या दृष्टीने अधिकाधिक सराव प्रश्नांचा समावेश येथे करण्यात आला आहे. परंतु प्रत्येक विषयाचे विस्तृत स्वरुप पाहता पुरक अभ्यासासाठी उमेदवाराने या पुस्तकाबरोबरच क्रमीक पुस्तकांचाही वापर करावा असे सुचवावेसे वाटते. आयोगाच्या अभ्यासक्रमानुसारच संबंधित पुस्तकाची रचना करण्यात आली असल्यामुळे विद्याथ्र्यांना यश मिळवून देण्यात हे पुस्तक निश्चितच महत्त्वाची भूमिका बजावेल यात शंका नाही.

संपादन

नाथे पब्लिकेशन प्रा. लि.

Key features of the eBook

- सुधारित अभ्यासक्रमावर आधारित

- राज्यसेवा पूर्व परीक्षा अभ्यासक्रम समाविष्ट

- सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा सूची

- MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेची अद्यावत तयारी

- MPSC पूर्वपरीक्षा सराव प्रश्नसंच

- स्पर्धापरीक्षेला उपयुक्त

- तज्ज्ञ प्रशिक्षकांनी तयार केलेले.

- प्रत्येक घटकाचे अद्यावत प्रश्न.

- चालू घडामोडी

- आधुनिक भारताचा इतिहास

- स्पर्धा परीक्षा, शैक्षणिक, माहितीपर

- Maharashtra State Services Examination

- Maharashtra Public Service Commission

- MPSC State Service Prelim Revised Syllabus

- MPSC Current Affairs

- MPSC study material

महामानव शिवाजी महाराज
महामानव शिवाजी महाराज: विकृत जेम्स लेनच्या पुस्तकाचा सडेतोड प्रतिवाद!

महामानव शिवाजी महाराज : विकृत जेम्स लेनच्या पुस्तकाचा सडेतोड प्रतिवाद!

शिवाजी-हिंदू किंग ऑफ इस्लामिक इंडिया या नावाचे वादग्रस्त पुस्तक अमेरिकी लेखक जेम्स लेन यांनी लिहिले, त्यावेळी त्याचे पडसाद भारतात उमटणे साहजिकच होते. खरे तर या पुस्तकाचे नावच आक्षेपार्ह आहे. मुस्लिम भारतातील हिंदू राजा ही छत्रपती शिवाजी महाराजांची कधीच ओळख नव्हती! या पुस्तकावर महाराष्ट्र सरकारने 2005 साली बंदी घातली होती, ती 2010 साली सर्वोच्च न्यायालयाने उठविली. त्यामागील कारणे काहीही असली तरी हे पुस्तक भारतात खुलेपणाने विकले जाऊ लागले. या पुस्तकाची दुसरी आवृत्तीही जगभरात विकली गेली.

या पुस्तकातील अनेक मुद्दे हे वादग्रस्त, दिशाभूल करणारे आणि विसंगतीपूर्ण आहेत, त्यामुळे त्याबद्दल तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होणे साहजिकच होते. केवळ तोडमोड करून अथवा निषेध करून चालणार नाही. तर या पुस्तकातील मुद्यांचा प्रतिवाद केला गेला पाहिजे, या उद्देशाने इतिहासाचे अभ्यासक डॉ. प्रमोद पाठक यांनी महामानव-छ. शिवाजी महाराज या नावाचे पुस्तक लिहिले आणि नागपूरच्या नचिकेत प्रकाशनाने प्रकाशित केले आहे.

डॉ. पाठक यांची गोवादूत मध्ये याच विषयावरील लेखमाला वाचनीय ठरली होती आणि त्याला वाचकांचा चांगला प्रतिसादही लाभला होता. त्याच लेखांचे हे संकलन पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाले आहे. एकूण 29 लेख या पुस्तकात आहेत. जेम्स लेनने आपल्या पुस्तकात केलेले इतिहासाचे विकृतीकरण, जेम्सचे अज्ञान, धार्मिक लुडबुड, भारतीय संशोधनावर चिखलफेक, विसंगत विधाने, निरर्थक प्रश्न याबाबत वेगवेगळ्या लेखांमधून डॉ. पाठक यांनी आपल्या अभ्यासपूर्ण विवेचनाद्वारे केलेला प्रतिवाद वाचकांना अंतर्मुख व्हायला भाग पाडतो. कारण त्यांनी हे मुद्दे खोडताना जे ऐतिहासिक दाखले दिले आहेत. ते चपखल तर आहेतच, शिवाय भारतीय इतिहासतज्ज्ञ आणि परदेशी संशोधक यांच्या लेखी संदर्भासह दिले आहेत.

ज्येष्ठ इतिहास संशोधक विजय देशमुख, इतिहासाचार्य राजवाडे, ग.भा. मेहंदळे, वा.गो. गोखले, महादेवशास्त्री जोशी ते श्रीराम कामत यांच्या लेखनाचा संदर्भ देत, जेम्स फाकडा बाबासाहेब पुरंदरे आणि सरदेसाई यांच्यावरही कसा घसरला हे सप्रमाण दाखवून देताना डॉ. पाठक यांनी या पुस्तकलेखनासाठी घेतलेली मेहनत आणि त्यासाठी केलेल्या अफाट वाचनाची कल्पना येते. जेम्स लेनच्या अत्यंत पक्षपाती आणि कलुषित वृत्तीने लिहिलेल्या या पुस्तकाला ऐतिहासिक आधार तर अजिबातच नाही, उलट छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा कलंकित करण्याचा उद्देश मात्र स्पष्ट होतो, हे डॉ. पाठक यांच्या पुस्तकामुळे मराठी वाचकांसमोर अतिशय ठळकपणे आणि सबळ पुराव्यांसह आले आहे.

लेन यांचा महाराजांवर चिखलफेक करण्याचा हेतू उघड झाला आहे. या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद मूळ लेखकापर्यंत गेल्यास त्याच्या डोळ्यात झणझणीत अंजन पडल्याशिवाय राहणार नाही. तशी क्षमता डॉ. पाठक यांच्या लेखनात निश्चितपणे आहे. इतिहासातील काही घटना नव्याने जाणून घेण्यासाठीही हे पुस्तक अभ्यासकांनी अवश्य वाचावे. अशा या पुस्तकासाठी लेखक व प्रकाशन दोघांचेही अभिनंदन करणे आवश्यक आहे.

पुस्तक : महामानव छ. शिवाजी महाराज

लेखक : श्री. प्रमोद पाठक, पृष्ठ : 80, किंमत : 80 रु.

प्रकाशक : नचिकेत प्रकाशन

संपर्क : नचिकेत प्रकाशन,24, योगक्षेम ले-आऊ ट, स्नेह नगर, वर्धा रोड, नागपूर -440 015.

फोन : 0712-2285473

मोबाईल : 8149930004, 9225210130