वाचा पुस्तकविश्व दिवाळी अंक २०१०
‘पुस्तकविश्व’चा पहिलावहिला दिवाळी अंक – “पुस्तकविश्व दिवाळी अंक २०१०” चोखंदळ वाचकांसाठी एक नजराणाच आहे. अनुभव, पुस्तकपरिचय, लेखकांचे परिचय, मुलाखत आणि कवितासंग्रहाचे परिचय असे विविधरंगी लेखन आपणास या अंकात वाचायला मिळेल. पुस्तकविश्वचा दिवाळी अंक हा पुस्तक/लेखकांबद्दल असे जरी असले तरी लेखांच्या विषयात वैविध्य राखायचा प्रयत्न प्रकाशकांनी केला आहे. पुस्तकविश्व दिवाळी अंकाची मांडणी साधी पण आकर्षक असून, वाचायला भरपूर आणि उत्तम लेख आहेत. ‘डाऊन द मेमेरी लेन’ हा लेख अतिशय चांगला आहे.
मिलिंद मुळीकांच्या मुखपृष्ठापासून पुस्तकविश्व दिवाळी अंकाची सुरुवात होते. नंतर, ज्याँ पॉल सार्त्र या थोर फ्रेंच लेखकाच्या ‘ल माँ’ (शब्द) या आत्मचरित्रात्मक पुस्तकातील एका छोट्या भागाचा मूळ फ्रेंचमधून मराठीत केलेला “ग्रंथालयातील भटकंती’ हा अनुवाद वाचायला मिळतो. “वैज्ञानिक व पुस्तकांचे जग’ आणि “”साभार परती’चा शिक्का’ असे दोन लेख प्रभाकर नानावटी यांनी लिहिले आहेत. बौद्धांचे आणि जैनांचे संस्कृत साहित्यातले योगदान काय, याचा आढावा घेणारा एक लेख या अंकात आहे. होडावडेकरांचा “पुनर्वाचनाय च’ हा एखादे पुस्तक परत वाचतानाच्या अनुभवाला शब्दांत आणण्याचा प्रयत्न आहे. बाकी, पुस्तक परिचयाचा एक विभाग आहे. कवितासंग्रहांचा परिचय नि लेखकांचे परिचय असेही दोन विभाग आहेत.
पुस्तकविश्व दिवाळी अंक २०१० चे खास आकर्षण म्हणजे सुप्रसिद्ध लेखिका कविता महाजन यांची दिलखुलास मुलाखत. ‘भिन्न’ आणि ‘ब्र’ या त्यांच्या प्रसिद्ध पुस्तकांबद्दल त्यां भरभरुन बोलल्या आहेत, या पुस्तकांसाठी काम करतांना त्यांना आलेले अनुभव सांगत आहेत तसेच त्यांच्या इतर प्रकल्पांची माहिती देत आहेत. छापील पुस्तकांची पुढची पिढी म्हणजे डिव्हीडीवरचे पुस्तके येउ घातलीत, त्यांच्याबद्दल मत-प्रदर्शन करत आहेत.
‘पुस्तकविश्व’ची सुरुवात होऊन अजून उणेपुरे वर्षही झाले नाही. या एवढ्याश्या कालखंडात त्याने छान बाळसे धरले आहे. तुम्हां सर्व पुस्तकवेड्या रसिक वाचकांमुळेच हा पल्ला आपण गाठला आहे, ही जाणीव मनी ठेवून मी आपल्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि हा अंक आपणास आवडेल अशी आशा करतो.
वाचा पुस्तकविश्व दिवाळी अंक २०१०
KeyWords
पुस्तकविश्व, दिवाळी अंक, दिवाळी अंक २०१०, साहित्य, साहित्य चिंतन, मराठी, मराठी पुस्तके, marathi books online, marathi books, wacha marathi books , Read online, online books, read books online, eBook library, book reader, online library, eBooks for free, marathi online magazine
