साने गुरुजींची श्यामची आई कादंबरी अन्द्रोइड मोबाईल वर

साने गुरुजींची श्यामची आई कादंबरी अन्द्रोइड मोबाईल वर

Shyamchi Aai - Sane Guruji

साने गुरुजींची श्यामची आई कादंबरी

संस्कार म्हणजे नक्की काय? बहुतेकांच्या मते घरी संध्याकाळी शुभंकरोती म्हणणे, मोठयांचा आदर करणे, खरे बोलणे, स्वच्छतेचे पालन करणे… पण हे संस्कार मुलांमध्ये रूजणार कसे? संस्कार हे एका पिढीतून दुस-या पिढीत रूजवायचे असतात. संस्कारांचा अनमोल ठेवा साने गुरूजी यांनी ‘श्यामची आई’च्या रूपाने लिहून ठेवला आहे. ‘श्यामची आई’ पुस्तकावर कितीतरी पिढया संस्कारक्षम झाल्या; साने गुरुजीनी लिहिलेले ‘श्यामची आई’ हे पुस्तक कोणत्याही काळात उपयुक्त ठरणारे पुस्तक आहे. कित्येक पिढ्यांवर सुसंस्कार करण्याचं काम या एका पुस्तकाने केलं. नाशिकला जेलमधे असतांना साने गुरूजींनी आईच्या आठवणी ५ दिवसात लिहून काढल्या. साने गुरूजींचे ‘श्यामची आई’ हे काही आत्मचरित्र, कांदबरी किंवा निबंध नाही. मातेबद्दलच असणार प्रेम, भक्ति व कृतज्ञता यांच्या अपार भावना ‘श्यामची आई’ या पुस्तकात आहे. हे सुंदर पुस्तक वाचून वाचकांचे डोळे व हृदय भरून येईल. हे पुस्तक म्हणजे सच्च्या दिलाने लिहीलेल्या आईच्या आठवणीं आणि अंतकरणापासून आईला वाहिलेली श्रघ्दाजंली, हृदयातील सारा जिव्हाळा यात गुरूजींनी ओतलेला आहे.

आईच्या सान्निध्यात श्याम कसा घडला, आईच्या कोणकोणत्या गुणांचे त्याला अनुभव आले, आईची थोरवी त्याला कशी प्रत्ययाला आली हे सांगत असतानाच लेखकाने श्यामच्या मर्यादा, श्यामचे कोतेपण, क्षुदत्व सूचित केले आहे. ‘रामरक्षा स्तोत्र’ उतरवून घेण्याची हकिगत, कळ्या तोडून आणण्याचा प्रसंग, घरातून पळून जाऊन परत आल्याचा प्रसंग, दोन आणे दक्षिणा आणण्याचा प्रसंग, वडिलांवर रागावण्या-रुसण्याचा प्रसंग, नोट चोरून घेण्याचा प्रसंग, श्लोक न म्हणता म्हटला असे खोटे बोलल्याचा प्रसंग, असे कितीतरी प्रसंग. आपल्या ठिकाणचे दुर्गुण श्यामला जसजसे जाणवतात तसतसे त्याचे व्यक्तिमत्त्व उजळत जाते, विकास पावते. पुण्य व पाप, सत्कर्म व दुष्कर्म, नीती व अनीती यांचे माणसाच्या हिताच्या दृष्टीने मूलभूत ठरणारे दंडक श्यामच्या आईच्या आचरणातून व उपदेशातून वेळोवेळी व्यक्त झाले आहेत.

Shyamchi Aai ebook - Sane Guruji

साने गुरुजींची “श्यामची आई” कादंबरी अन्द्रोइड मोबाईल वर

साने गुरुजींचे ‘श्यामची आई` हे पुस्तक पहिल्यांदा १९३५ साली प्रकाशित झाले. ‘अमृत महोत्सव’ पूर्ण करणाऱ्या ‘श्यामची आई’ पुस्तकाच्या ३ लाखांपेक्षा अधिक प्रती खपल्या आहेत. मराठी वाचकांना आज एकविसाव्या शतकातही जीवनाच्या वाटचालीची योग्य दिशा ‘श्यामची आई’ दाखवीत आहे. पुस्तकाच्या सुरुवातीस ‘प्रस्तावना’ व ‘प्रारंभ’ ही प्रकरणे असून नंतर ‘रात्र पहिली’पासून ‘रात्र बेचाळिसावी’पर्यंत ४२ प्रकरणे आहेत ती खालील प्रमाणे…

श्यामची आई : प्रस्तावना
श्यामची आई : प्रारंभ
श्यामची आई : रात्र पहिली – सावित्री व्रत
श्यामची आई : रात्र दुसरी – अक्काचे लग्न
श्यामची आई : रात्र तिसरी – मुकी फुले
श्यामची आई : रात्र चवथी – पुण्यात्मा यशवंत
श्यामची आई : रात्र पाचवी – मथुरी
श्यामची आई : रात्र सहावी – थोर अश्रू
श्यामची आई : रात्र सातवी – पत्रावळ
श्यामची आई : रात्र आठवी – क्षमेविषयी प्रार्थना
श्यामची आई : रात्र नववी – मोरी गाय
श्यामची आई : रात्र दहावी – पर्णकुटी
श्यामची आई : रात्र अकरावी – भूतदया
श्यामची आई : रात्र बारावी – श्यामचे पोहणे
श्यामची आई : रात्र तेरावी – स्वाभिमान-रक्षण
श्यामची आई : रात्र चौदावी – श्रीखंडाच्या वड्या
श्यामची आई : रात्र पंधरावी – रघुपति राघव राजाराम
श्यामची आई : रात्र सोळावी – तीर्थयात्रार्थ पलायन
श्यामची आई : रात्र सतरावी – स्वावलंबनाची शिकवण
श्यामची आई : रात्र अठरावी – अळणी भाजी
श्यामची आई : रात्र एकोणिसावी – पुनर्जन्म
श्यामची आई : रात्र विसावी – सात्त्विक प्रेमाची भूक
श्यामची आई : रात्र एकविसावी – दूर्वांची आजी
श्यामची आई : रात्र बाविसावी – आनंदाची दिवाळी
श्यामची आई : रात्र तेविसावी – अर्धनारी नटेश्वर
श्यामची आई : रात्र चोवीसावी – सोमवती अवस
श्यामची आई : रात्र पंचविसावी – देवाला सारी प्रिय
श्यामची आई : रात्र सव्विसावी – बंधुप्रेमाची शिकवण
श्यामची आई : रात्र सत्ताविसावी – उदार पितृहृदय
श्यामची आई : रात्र अठ्ठाविसावी – सांब सदाशिव पाउस दे
श्यामची आई : रात्र एकोणतिसावी – मोठा होण्यासाठी चोरी
श्यामची आई : रात्र तिसावी – तू वयाने मोठा नाहीस …मनाने
श्यामची आई : रात्र एकतिसावी – लाडघरचे तामस्तीर्थ
श्यामची आई : रात्र बत्तिसावी – कर्ज म्हणजे जिवंतपणीचा नरक
श्यामची आई : रात्र तेहतिसावी – गरिबांचे मनोरथ
श्यामची आई : रात्र चौतिसावी – वित्तहीनाची हेटाळणी
श्यामची आई : रात्र पस्तिसावी – आईचे चिंतामय जीवन
श्यामची आई : रात्र छत्तिसावी – तेल आहे तर मीठ नाही
श्यामची आई : रात्र सदातिसावी – अब्रूचे धिंडवडे
श्यामची आई : रात्र अडतिसावी – आईचा शेवटचा आजार
श्यामची आई : रात्र एकोणचाळिसावी – सारी प्रेमाने नांदा
श्यामची आई : रात्र चाळिसावी – शेवटची निरवानिरव
श्यामची आई : रात्र एकेचाळिसावी – भस्ममय मूर्ती
श्यामची आई : रात्र बेचाळिसावी – आईचे स्मृतिश्राद्ध

साने गुरुजींची श्यामची आई कादंबरी अन्द्रोइड मोबाईल वर डाऊनलोड करा

Shyamchi Aai
Tags: , , , , , , ,
Subscribe to Comments RSS Feed in this post

17 Responses

  1. सुंदर काम करीत आहात. अशा समाजोपयोगी कार्यासाठी तुम्हास भरपुर उत्साह, शक्ती व प्रेरणा मिळो ही सदिच्छा व शुभेच्छा!

    • माधव सर नमस्कार!

      मराठी रसिकांचे प्रेम, शुभेच्छा सदैव उत्साहित करतात. साहित्य चिंतनवर असाच सर्वांचा लोभ असावा अशीच इच्छा आहे.
      आपल्या प्रतिसाद बद्दल धन्यवाद!

      चेतन अकर्ते

  2. Tumchya karyaa cha koutuk karaava tevaDha thode. Tumhaalaa Haardik Shubhechhchhaa! Rasikaanchaa pratisaad nakkee vaaDhel.

    • शेखर सर!
      मराठी साहित्य रसिकांच्या अश्या प्रतिक्रिया, प्रतिसाद सदैव प्रेरणा देतात; काहीतरी नवीन करायला उत्साहित करतात.

      धन्यवाद!
      चेतन अकर्ते

  3. shyam cha aaila maza sastang abhivadan. ani aasach chitrapat ya kalat yayala pahijet.

  4. Dear friend,
    I congratulate you for your Nobel attempt of sharing such important materials.on this android platform. I wish u grand success in your projectas well as in life.
    Thanks a lot.

  5. Sarva-pratham aplya kamgiri baddal dhanywad. Marathi preshakanche manobal vadhavnari, hi kharach mothi kirti ahe. Yanantar hi amhala ashech navin kadambari ani lekh vachnyas milnar yachi khatri ahe. “katarvel” ha pra k atre likhit zakkas lekh, krupaya aplya yadit samavisht karava hi vinanti.
    punha ekda aplya ya yashashvi prayantna baddal. hardik subhechha.
    mazya chotyashya blog baddal manogat kalvave.
    Dhanywad.

  6. Sir tumhala Khup hardikshubhekcha!
    Asse,ch kahitari utung kara aai sharda tumchya pathishi aahe

  7. tumchyya prayatnamule mobile savvy pidhila changle pustak vachavyas milel

  8. mi kadhi pasun asha website chya shodhat hoto n aaj maja shodh sampla
    dhanyawad……
    please try to available YAYAATI n all other popular marathi novels

  9. Thank u very very much for downld this novel.

  10. Very Nice This is a book

  11. सुंदर काम करीत आहात. अशा समाजोपयोगी कार्यासाठी तुम्हास भरपुर उत्साह, शक्ती व प्रेरणा मिळो ही सदिच्छा व शुभेच्छा!

  12. thanks sir

  13. kharch aajchya kalat shamchya aai chi garaj aahe.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*
*